नैसर्गिक साधनसंपत्ती

प्रस्तावना

views

5:14
आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास करणार आहोत. निसर्गाविषयी मानवाला फार पूर्वीपासून कुतूहल वाटते. या कुतूहलामुळे मानवाने निसर्गातील विविध गोष्टींचा शोध लावला. निसर्गामध्ये विविध साधनसंपत्ती आहे. या साधनसंपत्तीचा मानवाला खूप उपयोग होतो. निसर्गातून मिळणाऱ्या संसाधनालाच नैसर्गिक संसाधने म्हणतात. निसर्गातून आपल्याला बरेच पदार्थ, घटक, वस्तू मिळतात. यांनाच आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. हवा, पाणी, वनस्पती, प्राणी, पक्षी, खनिजे ही निसर्गातील विविध साधनसंपत्ती पृथ्वीवरील सजीवांना खूप उपयुक्त आहे. निसर्गातील या विविध संसाधनांच्या आधारे मानव, प्राणी, आणि पृथ्वीवरील प्रत्येक सजीव आपल्या गरजा भागवत असतो. निसर्गामध्ये शिलावरण, जलावरण व वातावरण अशी आवरणे आढळून येतात. ‘जलावरण म्हणजे पाण्याने व्यापलेला भाग. तर निसर्गातील वातावरणामध्ये विविध वायू, धुलीकण असे घटक आढळून येतात. तसेच जमीन, जमिनीखालचे कठीण कवच, जमिनीवरील माती, दगड, खडक, डोंगर, पर्वत, पठार अशा सर्वच भूभागाला ‘शिलावरण’ असे म्हणतात.