ताऱ्यांची जीवनयात्रा

प्रस्तावना

views

4:16
तारे हे स्वयंप्रकाशी असतात. तर ग्रह हे परप्रकाशी असतात. ग्रह हे ताऱ्याभोवती परिभ्रमण करतात. त्यामुळे ग्रहाच्या स्थानात नेहमी बदल होत असतो. तारे ग्रहांपेक्षा खूप मोठे असतात. पृथ्वीच्या वातावरणामुळे तारे लुकलुकताना दिसतात. तारे हे हायड्रोजन, हेलिअम किंवा त्यासारख्या हलक्या मूलद्रव्यांचे बनलेले असतात. आपल्याला दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी काही तारे तेजस्वी असतात. तर काही तारे अंधुक असतात. निळे, पांढरे, पिवळे, तांबूस असे विविध रंगांचे तारे आकाशात पाहायला मिळतात. सर्व घटकांनी मिळून सूर्यमाला बनलेली आहे. आपली ही सूर्यमला एका दिर्घिकेत म्हणजेच आकाशगंगेत सामावलेली आहे. दीर्घिका म्हणजे अब्जावधी तारे, ग्रहमालिका व ताऱ्यांच्या रिकाम्या जागेत आढळून येणाऱ्या आंतरतारकीय मेघांचा समूह असते. हे विश्व असंख्य अशा अनेक दिर्घिकांनी मिळून बनलेले आहे. या दीर्घिकेचे आकार, जडणघडणही वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे तीन मुख्य प्रकारात विभाजन करतात.