संख्येचे विस्तारीत रूप.

प्रस्तावना संख्येचे विस्तारीत रूप.

views

5:07
आपण संख्येची स्थानिक किंमत म्हणजे काय ते शिकलो. आज आपण संख्येचे विस्तारीत रूप म्हणजे काय ते शिकणार आहोत. ३५ या संख्येत ३ ची स्थानिक किंमत ३० आहे. ५ ची स्थानिक किंमत ५ आहे. म्हणून ३० + ५ ला ३५ चे विस्तारित रूप म्हणतात. ९४ या संख्येत ९ ची स्थानिक किंमत ९० आहे. ४ ची स्थानिक किंमत ४ आहे. म्हणून ९० + ४ ला ९४ चे विस्तारित रूप म्हणतात. तसेच ६० या संख्येत ६ ची स्थानिक किंमत ६० आहे. 0 ची स्थानिक किंमत 0 आहे. म्हणून ६० चे विस्तारित रूप ६० + ० आहे. मी पुन्हा स्पष्ट करते हं. मुलांनो, ३५ या संख्येत ३ ची स्थानिक किंमत ३० आहे. ५ ची स्थानिक किंमत ५ आहे, म्हणून ३५ ही संख्या, तीस आणि पाच म्हणजेच ३० + ५ आहे. म्हणून ३० + ५ हे ३५ चे विस्तारित रूप आहे. २४ या संख्येत २ ची स्थानिक किंमत २० आहे. ४ ची स्थानिक किंमत ४ आहे. म्हणून २४ ही संख्या वीस आणि चार म्हणजेच २० + ४ आहे. म्हणून २० + ४ हे २४ चे विस्तारित रूप आहे.