टप्प्याने संख्या मोजुया

प्रस्तावना टप्प्याने संख्या मोजुया

views

4:02
तुम्हाला संख्या मोजता येतात. पण आज आपण शिकणार आहोत. यामध्ये सशाने मारलेल्या उड्या दाखवल्या आहेत. सशाने ज्या चौकटीवरून उड्या मारल्या त्या चौकटीतील संख्या कोणत्या आहेत हे पहा. त्या संख्या आहेत: ३ ६ ९ १२ १५ म्हणजेच सशाने ३ वरून उडी मारली ६ वर. ६ वरून उडी मारली ९ वर. ९ वरून उडी मारली १२ वर आणि १२ वरून उडी मारली १५ वर. सशाने प्रत्येक वेळी जी उडी मारली ती पुढील तीन संख्या मोजून. म्हणजे ३ च्या पुढे ३ संख्या मोजल्या तर ६ ही संख्या मिळते ४,५,६. ६ च्या पुढे ३ मोजल्या तर ९ ही संख्या मिळते ७,८,९. याप्रमाणे प्रत्येक वेळी ३ संख्या मोजून पुढची संख्या मिळते. म्हणून ३ च्या पुढे ६, ९, १२, १५ या ३ च्या टप्प्याने येणाऱ्या संख्या आहेत. सशाने मारलेल्या उड्या आपण पाहिल्या. त्याचप्रमाणे आता या हरणाने मारलेल्या उड्या पहा. हरणाने ज्या चौकटींवरून उड्या मारल्या त्या चौकटीतील संख्या कोणत्या आहेत हे पहा. त्या संख्या आहेत: ४ ९ १४ १९ २४ हरणाने ४ वरून उडी मारली ९ वर. ९ वरून उडी मारली १४ वर. १४ वरून उडी मारली १९ वर आणि १९ वरून उडी मारली २४ वर. म्हणजे ४ च्या पुढे ५ संख्या मोजून ९ ही संख्या मिळते ५,६,७,८,९. ९ च्या पुढे ५ संख्या मोजून १४ संख्या मिळते १०,११,१२,१३,१४. १४ च्या पुढे ५ मोजून १९ ही संख्या मिळते १५,१६,१७,१८,१९. आणि १९ च्या पुढे ५ मोजून २४ ही संख्या मिळते २०,२१,२२,२३.२४. अशाप्रकारे प्रत्येक वेळी ५ संख्या मोजून आपल्याला पुढची संख्या मिळते. म्हणून ५ च्या पुढे ४, ९, १४, १९, २४ या ५ च्या टप्प्याने येणाऱ्या संख्या आहेत. आता तुम्हांला टप्प्याने येणाऱ्या संख्या समजल्या.