बेरीज बिनहातच्याची

प्रस्तावना बेरीज बिनहातच्याची

views

4:42
आज आपण एक अंकी संख्यांच्या बेरजेची थोडी उजळणी करूया. हे गणित पहा. ४ + २ हे उभ्या मांडणीमध्ये लिहिले आहे. इथे ४ हा एकक आहेत आणि २ सुद्धा एककच आहेत. म्हणून तो दोन्ही एककाच्या घरात लिहिले आहेत. ४ + २ मिळून झाले ६. ६ सुद्धा एककच आहेत. म्हणून ते उत्तरात एककाच्या घरात लिहिला आहे. जसे संख्या लिहून हे गणित सोडवले आहे तसेच ते वस्तूंच्या सहाय्यानेही सोडवले आहे. इथे माचीसच्या ४ काड्या + २ काड्या मिळून ६ काड्या झाल्या आहेत. म्हणून उत्तरात म्हणजे एककाच्या घरात ६ काड्या दाखवल्या आहेत. आता पर्यंत आपण जी गणिते सोडवली ती सर्व एक अंकी संख्यांची गणिते होती. म्हणजेच सर्व गणितात एक अंकी संख्येची एक अंकी संख्येशी आपण बेरीज केली. पण आता मात्र आपण दोन अंकी संख्याची बेरीज करूया. यामध्ये दोन अंकी संख्येमध्ये दुसरी दोन अंकी संख्या मिळवूया. जसे आपण एक अंकी संख्यांचे गणित सोडवले होते, तसेच इथे दोन अंकी संख्यांचे गणित सोडवू. म्हणजे अंकांत आणि वस्तूंच्या साहाय्याने उभ्या मांडणीत सोडवू. इथे २३ आणि १२ यांची बेरीज करायची आहे. २३ मध्ये ३ एकक आणि २ दशक आहेत. म्हणून ३ एककाच्या घरात लिहू. आणि २ दशकाच्या घरात लिहू. तसेच १२ मध्ये २ एकक आणि १ दशक आहे. म्हणून एककाच्या घरात २ आणि दशकाच्या घरात १ लिहू. आता दोघांची बेरीज करू. मुलांनो हे लक्षात ठेवा की बेरजेचे गणित सोडवताना कधीही सुरवात एककापासून करायची. इथे ३ एकक + २ एकक मिळून ५ एकक झाले. म्हणून उत्तरात एककाच्या घरात ५ लिहू. आता दशकाच्या घरात २ + १ मिळून 3 दशक झाले. म्हणून उत्तरात दशकाच्या घरात ३ लिहिले. म्हणजेच २३ + १२ मिळून ३५ झाले. आणि ३५ म्हणजेच ३ दशक आणि ५ एकक असतात