जैवतंत्रज्ञानाची ओळख

प्रस्तावना

views

04:34
विज्ञानाच्या अभ्यासामध्ये जैवतंत्रज्ञानाची ओळख करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सर्व सजीव घटकांचा अभ्यास हा जैवतंत्रज्ञानामध्ये केला जातो. सजीवांमध्ये अनेक प्रकारच्या ऊतीपेशी आहेत. आपण या पाठात आता वनस्पती व प्राणी यांच्या जैवतंत्रज्ञानाविषयी माहिती घेऊया.सजीवांतील सर्व कार्ये ही पेशी व ऊतींमार्फत पार पाडली जातात. पेशी हे सजीवांच्या शरीराचे लहानात लहान रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे. तर आता आपण ऊती विषयी जाणून घेऊ. ऊती: एकपेशीय प्राण्यांमध्ये त्यांचे सर्व कार्य हे पेशीअंगकामार्फत पार पाडले जातात. परंतु जास्तीत जास्त प्राणी हे बहुपेशीय आहेत. या बहुपेशीय प्राण्यांच्या शरीरातील विविध कार्ये पार पडावीत म्हणून शरीरातील पेशींचे गट एकत्र येतात व योग्य ती कार्ये पार पाडतात. ज्याप्रमाणे एखादे संघटन हे एकत्र येऊन कार्य करते तसेच शरीराचेही कार्य पार पाडले जाते. जसे अक्षर  शब्द  वाक्य  पाठ असे संघटन एकत्र आले की पाठ्यपुस्तक बनते. तसेच शरीराचे विशिष्ट कार्य पार पडण्यासाठी एकसारखे पेशी समूह एकत्र येऊन कार्य करतात. तर अशाप्रकारे विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. बहुपेशीय सजीवांच्या शरीरांमध्ये लाखो पेशी कार्य करत असतात. या सर्व पेशींची वेगवेगळ्या गटांत विभागणी केली जाते. ही विभागणी त्यांच्या कार्यानुसार केली आहे. जसे आपल्या शरीरातील स्नायूंच्या आकुंचन व शिथलीकरणामुळे आपल्या शरीराची हालचाल घडून येते. तर वनस्पतींमध्ये असणाऱ्या संवहनी ऊती ह्या अन्न व पाणी शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहचवतात. पेशीची रचना व त्यांचे कार्य हे योग्य प्रमाणात विभागल्यामुळे शरीरातील सर्वच प्रकारची कामे योग्य क्षमतेने पार पाडली जातात. सर्वसामान्यपणे ऊतींचे सरल ऊती आणि जटिल ऊती असे दोन प्रकार आहेत.