भारतीय उपखंड आणि इतिहास

भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग १

views

5:50
आपला भारत देश हा विस्ताराने म्हणजे आकाराने मोठा आहे. भारत हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आहे. आणि भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतीं पैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत तो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भौगोलिक दृष्ट्या भारताचे हिमाच्छादित पर्वत (हिमालय), गंगेचे खोरे, वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. आपल्या देशाच्या चारही बाजूंना म्हणजेच उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम दिशांना नैसर्गिक सीमा आहेत. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ अशियाई पृष्ठाला धडकले. यामुळे भारताच्या उत्तर व ईशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मध्य भारतातील नर्मदा ही सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान- निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे सोडली तर उरलेला सर्व प्रदेश हा भौगोलिक दृष्ट्या सलग आहे. मित्रांनो आज आपल्या शेजारील दोन देश म्हणजेच पाकिस्तान आणि बांग्लादेश हे दोनही देश भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी भारताचाच भाग होते.आपण जर भारताच्या इतिहासाचा विचार केला तर त्यातील ६ भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. कसे ते आपण पाहू.