हडप्पा संस्कृती

प्रस्तावना

views

3:11
जगात अनेक देशांच्या वेगवेगळ्या संस्कृती दिसून येतात. उदा.:- ग्रीक संस्कृती, अरब संस्कृती, इजिप्त संस्कृती, भारतीय संस्कृती इ. संस्कृती अतिशय प्राचीन आहेत. भारतीय संस्कृतीतील हडप्पा संस्कृती आणि वैदिक संस्कृती या दोन भिन्न संस्कृती आहेत.आपण हडप्पा संस्कृतीची माहिती घेण्यापूर्वी आपण प्रथम संस्कृती म्हणजे काय हे जाणून घेऊ. संस्कृती म्हणजे एखादया विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट कालखंडातील व्यक्तींची जीवन जगण्याची पद्धत किंवा त्यांची वैशिष्ट्ये होत. आहार, पोशाख, घरबांधणी, नगररचना, वेशभूषा, दागिने इ. संस्कृतीची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील.पंजाबमधील रावी नदीच्या काठी इ.स.१९२१च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्ग बांधण्याचे काम सुरू होते. तेंव्हा तिथे काही जुन्या विटांचे काही भाग सापडले. ते नेमके कधीच्या कालखंडातील आहेत, याचा शोध घेण्यासाठी त्यावेळचे इंग्रज अधिकारी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू झाले आणि एका प्राचीन संस्कृतीची माहिती उजेडात आली. या संस्कृतीचे अवशेष म्हणजेच शिल्लक राहिलेल्या जुन्या गोष्टी प्रथम `हडप्पा` येथे सापडले. म्हणून नव्यानेच सापडलेल्या या संस्कृतीला `हडप्पा संस्कृती` असे म्हणतात. ही संस्कृती मुख्यत्वे सिंधू नदीच्या प्रदेशात असल्याने तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात.