हडप्पा संस्कृती

मुद्रा-भांडी व महास्नानगृह

views

3:12
मुद्रा-भांडी हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौकोनी आकाराच्या असून स्टीएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. मुद्रा म्हणजे ठसे किंवा शिक्के होय.हडप्पा कालीन मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती असत. त्यांमध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे अस्तित्वात असणारे प्राणी आणि एकशृंगासारखे काल्पनिक प्राणी पाहायला मिळतात. या प्राण्यांसारख्याच मनुष्याकृतीही आढळतात. या मुद्रा ठसे उमटवण्यासाठी वापरल्या जात. हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकारांची भांडी मिळाली आहेत. त्यांमध्ये लाल रंगाच्या भांड्यांच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. माशांचे खवले,एकमेकांत गुंतलेली वर्तुळे,पिंपळाचे पान यांसारख्या प्रतीकांचा त्यात समावेश आहे. कुंभाराच्या चाकावर बनवलेली सुंदर नक्षीकाम केलेली मातीची भांडी आढळून आली आहेत. याशिवाय तांबे, ब्रांझ आणि चांदीची भांडी सापडली, परंतु याचे प्रमाण मात्र अत्यल्प होते. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत झालेल्या व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या मृतदेहाबरोबर मातीची भांडीही पुरत असत. महास्नान गृह: हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती. येथे एका भव्य स्नांनगृहाचे अवशेष सापडले आहेत. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ २.५ मीटर खोल होते. त्याची लांबी सुमारे १२ मीटर आणि रुंदी सुमारे ७ मीटर होती. स्नानकुंड म्हणजे जेथे आंघोळ केली जाते ती जागा.