प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह

अष्टांगिक मार्ग

views

4:12
अष्टांगिक मार्ग –अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. ज्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. त्या गोष्टी अश्या १. सम्यक् दृष्टी : चार आर्यसत्याचे ज्ञान होय. म्हणजेच निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.२. सम्यक् संकल्प : हिंसा वगैरे तत्त्वांचा त्याग होय. म्हणजे योग्य निर्धार, विचार.३. सम्यक् वाचा : असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे म्हणजे करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.४. सम्यक् कर्मांत : प्राण्यांची हत्या, चोरी, आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे. म्हणजेच उत्तम कर्म / योग्य कृत्ये करणे.५. सम्यक् आजीव : उपजीविका गैर मार्गाने न करता योग्य मार्गाने करणे म्हणजे वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.६. सम्यक् व्यायाम : व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत, उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा, चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत, तसेच उत्पन्न झाली असल्यास नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे. म्हणजे वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.७. सम्यक् स्मृती : मन एकाग्र करून लोभ, मोह, क्रोध वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त योग्य रीतीने समजून घेणे. म्हणजे तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून मनाला जागृत ठेवणे.८. सम्यक् समाधी : चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. म्हणजे कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.