परिमिती व क्षेत्रफळ

परिमिती उजळणी

views

4:9
परिमिती उजळणी : मुलांनो आजपर्यंत आपण विविध भौमितिक आकृत्यांचा अभ्यास केला आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक वस्तू हाताळत असतो. तुमच्याकडे वही, पुस्तक , कंपास पेटी अशा अनेक वस्तू असतात. त्या वस्तूंना एक विशिष्ट आकार असतो. त्या आकारावरून आपण ओळखतो की रुमाल चौरसासारखा दिसतो. पुस्तक आयतासारखे आहे. इ. 4 थी मध्ये आपण परिमितीचा अभ्यास केला. कोणत्याही आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती होय, हे आपण पाहिले.