प्राचीन भारत :- सांस्कृतिक

विज्ञान

views

5:23
विज्ञान : आपण आजच्या युगाला विज्ञान युग किंवा तंत्रज्ञानाचे युग म्हणतो. परंतु, प्राचीन काळातही भारतीय वैद्यकशास्त्रात प्रगती झाली होती. अनेक रोगांवर उपचार करण्याच्या पद्धती त्याकाळीही विकसित झाल्या होत्या. भारतीय वैद्यकशास्त्राला ‘आयुर्वेद’ असे म्हंटले आहे. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. यामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, त्यावरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. तसेच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचर करण्यात आला आहे.आपण पाहिले आहे की, बिम्बिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. तसेच कुशाण राजा कनिष्काच्या दरबारात चरक नावाचा वैद्य होता. त्याने ‘चरकसंहिता’ हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची माहिती लिहिली आहे. चिकित्साशास्त्र म्हणजे रोग, रोगाची कारणे, लक्षणे, निदान, उपचार यांची माहिती होय. सुश्रुत हे प्राचीन भारतातील शल्यविशारद होते. ‘सुश्रुत संहिता’ या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या १२० पेक्षा अधिक हत्यारांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात शस्त्रक्रियांचे म्हणजे ऑपरेशनांचे आठ भागात वर्गीकरण केले गेले आहे.