विभाज्यता

प्रस्तावना

views

3:49
शिक्षक:- मुलांनो, गणित विषयामध्ये तुम्हाला पाढ्यांचा उपयोग कशासाठी होतो? सांगा पाहू. विद्यार्थी :- गुणाकार आणि भागाकार करताना पाढ्यांचा उपयोग होतो. शिक्षक: अगदी बरोबर! गुणाकार आणि भागाकार हया क्रिया करतांना पाढे पाठ असणे खूप महत्त्वाचे असते. आणि भागाकार करत असताना दिलेल्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो ते कळण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असणे आवश्यक असते. या पाठात आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत. • 2 ची विभाज्यतेची कसोटी :- जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी, 0,2,4,6,8 हया संख्या असतील तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. • 5 ची विभाज्यतेची कसोटी :- जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हया संख्या असतील तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. • 10 ची विभाज्यतेची कसोटी :- जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते. म्हणजे एकक स्थानातील संख्येवरून आपण 2, 5 आणि 10 च्या विभाज्यतेची कसोटी ओळखू शकतो. चला तर आता आपण काही उदाहरणे सोडवूया.