भरती- ओहोटी

भरती ओहोटीची कारणे

views

3:29
सागरजलाची हालचाल होऊन विविध ठिकाणी सागराला भरती – ओहोटी येते, त्यासाठी कारणीभूत असणारे घटक म्हणजेच 1) चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल : सूर्यापेक्षा चंद्र हा पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरीतीने कार्य करते. त्यामुळे चंद्रा समोरील भागाला भरती येते व त्याच्या काटकोनातील भागांना ओहोटी येते. 2) पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे : पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीकचा प्रत्येोक भाग 24 तासात एकदा चंद्रासमोर येतो. त्यापवेळी चंद्रासमोरील भागावर भरती येते. त्यावचवेळी त्यायच्याअविरुद्ध बाजूलाही भरती येते. 3) परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा : या केंद्रोत्सारी प्रेरणेमुळे चंद्रासमोरील भागाला जेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे भरती येते, तेव्हाच त्याच्या विरूद्ध बाजूला पृथ्वीच्या परिवलनाच्या केंद्रीत्सारी बलामुळे भरती येते. म्हणजे ही गोष्ट या आकृतीवरून स्पष्ट होते.