वारे

विशेष माहिती

views

3:42
दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. कारण दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठावर जसा डोंगरदऱ्याचा उंच सखलपणा असतो तसा इथे आढळत नाही. त्यामुळे वाऱ्याच्या वेगाला अडथळा दक्षिण गोलार्धात होत नाही. ४०० दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहत असतात. म्हणून त्यांना या भागात ‘गरजनारे चाळीस म्हणजेच Roaring Forties असे म्हणतात. ५०० दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहतात. म्हणून या भागात त्यांना ‘खवळलेले पन्नास’ म्हणजेच Furious Fifties असे म्हणतात. ६०० दक्षिण अक्षांभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना ‘किंचाळणारे साठ’ म्हणजेच Screeching Sixties असे म्हणतात. उत्तर गोलार्धात 40०,50० किवा 60० अक्षांशाच्या भागात वाऱ्याचे स्वरूप असे आढळत नाही कारण तिथे भूपृष्ठाचा भाग असतो त्यामुळे वाहणाऱ्या वाऱ्याना अडथळा निर्माण होतो.