संविधानाची उद्देशिका

उद्देशिका

views

4:01
सविधान म्हणजे काय ते पाहिल्यावर आता आपण उददेशिकेचा अर्थ काय आहे ते समजून घेणार आहोत. सर्व मुलांना उददेशिका माहीत असावी असे सरकारचे धोरण असल्यामुळेच सर्व शाळांमधील पाठ्यपुस्तकातील पहिल्या पानावर उद्देशिका दिली असते. त्यामुळे तुम्हाला उददेशिका तर पाठ असणारच. पण त्याचा सखोल अर्थ आपण या पाठात पाहणार आहोत.संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही उद्दिष्टे, हेतू असतात. ती उद्दिष्टे, हेतू काय आहेत? कायद्याची गरज का आहे? या गोष्टी प्रथम सर्वांसमोर स्पष्ट कराव्या लागतात. त्यानंतर कायद्यातील इतर तरतुदी केल्या जातात. ती उद्दिष्टे, हेतू, कायद्यातील तरतुदी यांची थोडक्यात आणि सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. ही प्रस्तावना म्हणजे आपल्या सविधानाचा प्राणच आहे असे आपण म्हणू शकतो. कारण त्यातील प्रत्येक शब्दाला सखोल अर्थ आहे. संविधानाच्या प्रस्तावनेलाच ‘संविधानाचे प्रास्ताविक’ , ‘संविधानाचा सरनामा’ , किंवा ‘संविधानाची उद्देशिका’ असे म्हणतात.