हवेचा दाब

उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे

views

3:45
तुम्हाला माहीत आहे की आपली पृथ्वी गोल आहे आणि ती विषुववृत्तीय भागात फुगीर आहे. तर ध्रुवीय भागात वक्राकार आहे. म्हणजेच विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाऊ तसतसे प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते. या पृथ्वीच्या आकारामुळे विषुववृत्तीय भागापेक्षा दोन्ही ध्रुवाकडील भागात वाऱ्यांना पृथ्वीच्या बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो. म्हणजे त्यांना जास्त क्षेत्रात प्रवाह करावा लागत नाही. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेमुळे घर्षण कमी होते. तसेच पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाऊन तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हा परिणाम ५५० ते ६०० अक्षवृत्तांच्या दरम्यान उत्तर व दक्षिण गोलार्धात दिसून येतो. परिवलन गती म्हणजे पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्याची गती होय. पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास म्हणजे एक दिवस लागतो. ध्रुवीय प्रदेशांत पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्यांना ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे म्हणतात. ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे उत्तर व दक्षिण गोलार्धात 80 ते 90 या अक्षवृत्तांच्या दरम्यान दिसून येतात. ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रुवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते, तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. तर सूर्य दक्षिण दिशेस सरकतो त्यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात.