हवेचा दाब

हवेच्या दाबाचे परिणाम

views

2:58
हवेच्या दाबामुळे वारे व वादळे निर्माण होतात. एखाद्या ठिकाणची समुद्रपाटीपासूनची उंची हवेच्या दाबाच्या आधारे मोजणे शक्य होते. हवेच्या दाबामुळे आरोह पर्जन्याची निर्मिती होते. हवेच्या दाबाचा सजीवांच्या श्वसनक्रियेवरही परिणाम होतो.समदाब रेषा : “समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात, त्या रेषेला समदाब रेषा म्हणतात.” जसे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मोजतात त्या पद्धतीने हवादाब हा मिलिबार मध्ये मोजतात. हवेचा दाब हा मिलिबार या एककात मोजला जातो. त्यासाठी हवादाबमापक हे उपकरण वापरले जाते. पृथ्वीपृष्ठाजवळची हवेच्या दाबाची नोंद या उपकरणाद्वारे केली जाते. विषुववृत्तावर हवेचा दाब कमी असतो तर आर्क्टिकवृत्तावर हवेचा दाब जास्त आपल्याला माहीत आहे की, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडित असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जखडून राहतात. यामधून वायुरूपात असलेली हवा देखील सुटत नाही. म्हणजेच पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीने हवेला आपल्या दिशेने खेचते. त्यामुळे वातावरणातील हवा पृथ्वीपृष्ठाकडे ओढली जाते. म्हणून समुद्रसपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो. वातावरणातील हवेचा दाब सर्वत्रच असल्यामुळे आपल्यावरही हा हवेचा दाब कार्य करतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर साधारणपणे 100 किलोग्रॅम हवेचा दाब असतो.