संतांची कामगिरी

प्रस्तावना

views

4:21
या पाठात आपण महाराष्ट्रातील संतांची ओळख करून घेणार आहोत. परकीय राजवटीत त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्याचे, त्यांना एकत्र आणण्याचे काम या संतांनी केले. महाराष्ट्रात श्री.चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरु झालेली संतपरंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. विविध स्तरांमधून म्हणजे गरिबी, श्रीमंतीतून, विविध जाती धर्मातून आलेले संत होय. या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महंमद, संत तुकाराम, संत रामदास, संत निळोबा इ. संतांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई यांसारख्या स्त्री संत होऊन गेल्या. या संतानी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. दया म्हणजे दुसऱ्याचे भले करण्याकरीता प्रयत्न करणे. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे म्हणजेच आपल्या बोलण्याने, वागण्याने कोणालाही इजा किंवा दुखापत न करणे. परोपकार म्हणजे दुसऱ्याला मदत करणे. सेवा म्हणजे समाजातील दुखी, पीडित लोकांची सेवा करणे. समता म्हणजे आपण सर्वजन समान आहोत ही जाणीव मनात बाळगणे. बंधुता म्हणजे आपण सर्वजन एकमेकांचे भाऊबंद आहोत असे समजून वागणे. अशी शिकवण संतांनी लोकांना दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखेच आहेत. अशी समानतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनीही आपले कार्य केले.