स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त

प्रस्तावना

views

3:06
शिवरायांच्या कार्यात अडथळा आणण्याचे काम स्वकीयांनी, म्हणजे आपल्याच लोकांनीही केले. शिवरायांना त्याचा त्रास होत होता. महाराजांनी या स्वकीयांना धडा शिकविण्याचे ठरविले. त्यांनी अशा लोकांचा कसा बंदोबस्त केला त्याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत.शिवरायांचे कार्य बघून त्यांना साथ देण्यासाठी बारा मावळांतील मावळे त्यांच्या अवतीभवती गोळा झाले. शिवरायांनी सांगितलेली प्रत्येक कामगिरी ते प्रामाणिकपणे पार पाडत असत. शिवरायांचे हे मावळे स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असे मानत होते. साधी – भोळी प्रेमाने वागणारी मराठमोळी माणसे ती! त्यांना शिवराय म्हणजे सर्वस्व वाटत. पण याच प्रदेशातील काही मंडळींना शिवरायांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा हेवा वाटत होता. शिवरायांबद्दल त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण होत होता. अशा लोकांचा बंदोबस्त करणे गरजेचे होते.खंडोजी आणि बाजी घोरपडे हे मराठा सरदार आदिलशाहाच्या चाकरीत होते. त्यांचे शिवरायांबद्दलचे मत चांगले नव्हते. त्यांनी शिवरायांबद्दल आदिलशाहाला खोटे-नोटे सांगून त्यांच्याबद्दल आदिलशाहाच्या मनात राग निर्माण केला. त्यांनी शिवरायांना व त्यांच्या लोकांना त्रास देण्यासाठी कोंढाणा भागात धुमाकूळ घातला. ते लोकांना लुटू लागले, उभ्या पिकात जनावरे घालू लागले. परंतु शिवराय त्यांना घाबरले नाही. शिवरायांनी त्यांना पळवून लावले.