शैक्षणिक वाटचाल

प्रस्तावना

views

2:40
स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील शैक्षणिक बदलांची आणि त्याच्यात झालेल्या संशोधनाची माहिती घेणार आहोत. यात आपण प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण यांचा विचार करणार आहोत. तसेच आपल्या देशातील शैक्षणिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विविध संस्थांचीही माहिती घेणार आहोत. यावरून आपणास आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येईल. भारतातील शिक्षणाचा प्रश्न कठीण आणि गुंतागुंतीचा असून तो सोडविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत हे आपणास स्वतंत्र भारताची पाहिली जनगणना झाली तेव्हा समजले. म्हणजे इ.स. १९५१ च्या जनगणनेने त्याची कल्पना आली. पहिल्या जनगणनेत साक्षरता प्रमाण फक्त १७. % होते म्हणजे ज्यांना अक्षर ओळख आहे असे लोक एकूण लोकसंख्येच्या फक्त १७ % एवढे होते. उदा. देशाची लोकसंख्या जर १०० धरली तर १०० तील फक्त १७ लोकांना लिहिता – वाचता येत होते. यावरून भारताची त्यावेळची शैक्षणिक परिस्थिती किती बिकट होती ते लक्षात येते. परंतु, भारत सरकार व राज्य सरकार यांच्या मदतीने पुढे साक्षरतेचे प्रमाण वाढत गेले.