आपणच सोडवू आपले प्रश्न

सार्वजनिक समस्या

views

3:43
आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी पाहतो. तुम्ही रोज शाळेत येताना-जाताना, कधी बाजारात खरेदी करायला जाताना, तुम्हाला अनेक गोष्टी दिसत असतील. तेव्हा तुम्हाला अनेक प्रश्न पडत असतील. त्यातील काही प्रश्न आपण सोडवू शकू असे तुम्हाला वाटते. पण प्रत्यक्षात तुम्ही ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करता का?, हे महत्त्वाचे आहे. (पुस्तकातील चित्र) आपण म्हणजेच संपूर्ण मानवी समाज हा समूहाने राहतो. या समूहजीवनात विविध समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळे कधी- कधी समाजाचे स्वास्थ्य बिघडणे स्वाभाविक आहे. या समस्या आपण जर वेळच्या वेळीच सोडवल्या नाहीत तर त्या समस्यांचे खूप दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. समाजातील लोकांना जे प्रश्न किंवा ज्या समस्या भेडसावतात त्यालाच आपण ‘सार्वजनिक समस्या’ म्हणतो. आता आपण अशा सार्वजनिक समस्या कोणत्या असतात ते पाहू. पाण्याची समस्या, दुष्काळाची समस्या, कचऱ्याची समस्या, गर्दीची समस्या, आरोग्याची समस्या.