ओळख भारताची

नकाशाशी मैत्री

views

2:33
आपला भारत देश विविध संस्कृतींनी नटलेला आहे. प्राकृतिक बाबतीतही भारतात खूप नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत. या नाविन्यपूर्ण गोष्टींमुळे भारताची जगात एक वेगळीच ओळख आहे. आपल्या भारत देशात विविध नद्या, पर्वत, पठारे आहेत. यामुळे आपला भारत देश समृद्ध बनला आहे. देशभक्तीच्या विविध गीतांतून आपल्याला आपल्या भारत देशाची महती ऐकायला मिळते. भारत देशात विविध प्रकारची पिके घेतली जातात. अनेक प्रदेशातील स्थानिक परीस्थितीमुळे त्या प्रदेशांचे वेगळेपण आपल्याला दिसून येते. तेथील हवामानातही वेगळेपणा आढळून येतो. याच वेगळेपणामुळे वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यातही विविधता आढळून येते. जर आपल्याला एका दृष्टिक्षेपात भारत देशाची माहिती मिळवायची असेल तर ती कशी मिळेल? नकाशाच्या मदतीने. नकाशाच्या मदतीने आपण क्षणात आपल्या देशाची माहिती मिळवू शकतो. आता हा पहा नकाशा दिलेला आहे. त्या नकाशाचे निरीक्षण करून आपण आपल्याला माहीत असलेल्या नद्या, पर्वत, पठारे यांचे स्थान पाहूया. आपल्या देशभक्तीपर गीतांमध्ये कोण-कोणत्या नद्यांचा उल्लेख होतो? गंगा , यमुना, गोदावरी, कृष्णा.