अन्न टिकवण्याच्या पद्धती

पदार्थांची साठवण

views

3:56
आपल्या आहारात विविध प्रकारचे पदार्थ घेत असतो. त्यासाठी गहू, तांदूळ, डाळी, ज्वारी, कडधान्ये यांसारख्या धान्यांची आपल्याला सतत गरज भासते. रोजच्या आहारात ही सर्व धान्ये असतात. परंतु ही धान्ये वर्षभर सतत पीकत नाहीत. यांचे उत्पादन ठरावीक हंगामातच आपल्याला मिळत असते. गहू हे पीक रब्बी हंगामातच चांगल्या प्रकारे येते. म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये यांची पेरणी करतात. तर फेब्रुवारी मार्चमध्ये याची काढणी करतात. म्हणजेच ज्या दिवसात थंडी असते, त्या कालावधीत गहू हे पीक चांगले येते. हेच गहू वर्षभर पुरवावे लागतात. अशाच प्रकारचा प्रत्येक पिकाचा हंगाम असतो. एका हंगामात आलेले पीक पुढील हंगामापर्यंत वर्षभर पुरवावे लागते. म्हणून ते सुरक्षित ठेवण्याची गरज असते. विविध अन्नपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात. तांदूळ किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात पीकतो. महाराष्ट्रातील कोकण विभागात तांदूळ मोठया प्रमाणात होतो. तसेच दूध, दुधाचे पदार्थ म्हणजेच ताक, दही, पनीर, तूप दुग्धव्यवसाय केंद्रापासून आणि अंडी कुक्कुटपालन केंद्रापासून लोकांना मिळेपर्यंत टिकून राहण्याची सोय करावी लागते. दूध व दुधाचे पदार्थ तसेच अंडी हे पदार्थ नशिवंत आहेत. हे जास्त दिवस तसेच ठेवले तर खराब होऊन निरुपयोगी ठरतात. म्हणून हे पदार्थ चांगले राहावेत यासाठी सोय करावी लागते.