स्थिर जीवनाची सुरुवात

प्रस्तावना, पशुपालन व शेती

views

3:26
शेतीची सुरूवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्टय म्हणून सांगता येईल. या काळातील मानवाला शेतीच्या कामामुळे एके ठिकाणीच राहणे आवश्यक झाले. ह्या मानवाच्या अनेक पिढया गाव – वसाहती करून एकाच ठिकाणी स्थिरावल्या. मानवाच्या स्थिर जीवनाची सुरुवात कशी झाली तेच आपण या पाठात पाहणार आहोत. पशुपालन :- सर्वप्रथम पशुपालन म्हणजे काय हे समजून घेऊ. तर पशुपालन याचा अर्थ प्राणी पाळणे होय. कुत्रा, गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी, गाढव, घोडा, उंट असे काही प्राणी पाळायला माणसाने सुरूवात केली. या प्राण्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो. माणूस या प्राण्यांची देखभाल करू लागला. काळजी घेऊ लागला. माणसाला शिकारीसाठी आणि राखण करण्यासाठी कुत्र्याचा उपयोग होऊ लागला. गाय, म्हैस यांच्यापासून त्याला दूध मिळू लागले. शेतीच्या कामात बैलांचा उपयोग होऊ लागला. माणूस काही पाळीव प्राण्यांचे मांस खात असे. त्यांच्या कातडीचा माणसाला कपड्यांसाठी उपयोग होऊ लागला. उबदार कपड्यांसाठी मेंढ्यांची लोकर वापरली जात असे. बैल, गाढव, घोडा, उंट अशा प्राण्यांचा उपयोग माणसाने वाहतुकीसाठीही करून घेतला. हे प्राणी आपल्याला विविध प्रकारे उपयोगी पडतात.