शायिस्ताखानाची फजिती

प्रस्तावना

views

5:18
प्रस्तावना :- मुलांनो, विजापूरच्या आदिलशाहाला शिवाजीमहाराजांनी चांगलेच हैराण करून सोडले होते. अफजलखानासारख्या क्रूर, बलाढ्य अशा सरदाराचा महाराजांनी कोथळा बाहेर काढला होता. तर पन्हाळा गडाच्या वेढ्यातून महाराज सिद्दी जौहरला फसवून बाहेर पडले होते. अनेक प्रयत्न करूनही शिवाजी महाराज काही आदिलशाहाच्या हाती लागत नव्हते. शिवराय त्याच्या प्रत्येक डावाला पुरून उरत होते. त्याच्या एकापेक्षा एक पराक्रमी सरदारांना महाराजांनी आपला हिसका दाखविला होता. मराठ्यांच्या साम्राज्याला आदिलशाहामुळे होणारा त्रास थांबला. त्यामुळे स्वराज्याची दक्षिणेकडील बाजू काही काळासाठी सुरक्षित झाली. आदिलशाहाला धडा शिकवून, त्याला आपले राज्य मान्य करायला लावून मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. महाराजांनी त्यासाठी काय केले याची माहिती आपण या पाठातून घेणार आहोत.. शायिस्ताखानाची स्वारी :- मुलांनो, या काळात औरंगजेब हा दिल्लीचा मुघल बादशाहा होता. हा मुघल बादशाहांपैकी सर्वात क्रूर, धर्मवेडा असा बादशाहा होता. संपूर्ण हिंदुस्थानवर मुघलांचे वर्चस्व असावे असे त्याला वाटत असे. त्याने मध्य हिंदुस्थानपर्यंतचा सर्व भाग जिंकून घेतला होता. आता त्याचे लक्ष दक्षिणेकडे होते. अशातच शिवाजी महाराजांनी त्याच्या प्रदेशावर स्वा-या केल्या. त्यामुळे मुघल सैन्य स्वराज्यावर स्वाऱ्या करू लागले. त्यांच्या स्वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. प्रचंड हानी हे सैन्य स्वराज्याला पोहचवू लागले. असे असतानाही मुघलांच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाहा आणखी चिडला. त्याने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी व त्यांना धडा शिकविण्यासाठी त्याचा मामा शायिस्ताखान याला पाठवले. मराठे गनिमीकावा करण्यात पटाईत. शत्रू बेसावध असताना अचानकपणे त्यांच्यावर ते हल्ला करत व पटकन निघून जात. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्ताखानाचे सैन्य हैराण झाले, वैतागले. त्यांना मराठ्यांची कोणतीच चाल कळेना. ते अगदी गोंधळून गेले. शेवटी कंटाळून त्यांनी पुरंदरचा वेढा उठवला.