स्फूर्तीचा जिवंत झरा

स्फूर्तिदाता

views

4:05
स्फूर्तिदाता :- शिवरायांचे चरित्र म्हणजे सामान्यातील सामान्याला स्फूर्ति देणारे आहे. त्यांच्या चरित्रातून आपल्यालाही नवचैतन्य मिळते. काय होते महाराजांकडे स्वराज्य निर्माण करण्यासाठी? फक्त वडिलांना मिळालेली छोटीशी जहागिरी व काही जीवाला जीव देणारे मावळे. या तुटपुंज्या साहित्याच्या जोरावर त्यांनी स्वराज्य निर्माण केले. अशक्य ते शक्य करून दाखविले. मातृपितृभक्ती :- शिवराय नेहमी मासाहेब जसे संगितील तसे वागत असत. मासाहेबांच्या सर्व इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. महाराजांना आपले वडील शहाजीराजे यांच्याविषयी खूप आदर होता. साधुसंतांचा आदर :- शिवरायांची कुलदेवता ही तुळजापूरची भवानीमाता होती. प्रत्येक सुख दुःखाच्या वेळी महाराज या देवीचे रूप प्रथम आठवत मगच कार्याला सुरूवात करत. महाराजांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस म्हणजे राज्याभिषेकाचा. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानीमातेचे दर्शन प्रथम घेतले होते. महाराजांची भवानी मातेवर अपार भक्ती होती. तसेच ते साधुसंतांना फार मान देत.