वस्त्र -आपली गरज

प्रस्तावना

views

3:44
प्रस्तावना ;- मुलांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे, की अन्न, वस्त्र,निवारा या मानवाच्या सर्वात महत्त्वाच्या गरजा आहेत. यातील वस्त्र म्हणजे कपडयांची गरज ही सजीवांपैकी फक्त मानवाचीच गरज आहे. आपण वस्त्रे अंगावरती प्रामुख्याने दोन कारणांसाठी परिधान करीत असतो. एक म्हणजे लज्जा रक्षणासाठी आणि दुसरे म्हणजे आपल्या शरीराचे ऊन, वारा व पाऊस यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी आपण कपडे घालत असतो. मग आता आज आपण हे कपडे कसे व कोठे बनविले जातात, त्याची माहिती या पाठातून घेणार आहोत. यासाठी आता एक प्रयोग करून पाहूया. सांगा पाहू ! मुलांनो याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत. त्या कपडयांचे बारकाईने निरीक्षण करून गौरव, कार्तिक आणि सानिकाने त्यांना आवडलेल्या व हव्या असलेल्या कपडयांची निवड केली. पहा गौरवने ९, कार्तिकने ८ आणि सानिकाने १० असे तिघांनी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घेतले आहेत. छान! मुलांनो, आपल्याला अनेक प्रकारचे कपडे घालायला आवडतात आणि आपल्या आवडीचे कपडे आपल्याकडे भरपूर प्रमाणात असावेत असेही आपल्याला वाटते.