आपले भावनिक जग

प्रस्तावना

views

2:45
प्रस्तावना :- मुलांनो, आपण आपल्या मनातील भाव विविध प्रकारे प्रकट करीत असतो. आनंद, दु:ख, राग, प्रेम, तिरस्कार, चीड, वैताग यांसारख्या आपल्या मनातील अनेक भावना आपण आपल्या कृतीतून व्यक्त करीत असतो. यातील काही भावनांचा अतिरेक झाला किंवा आपण एखादया गोष्टीवर जास्तच विचार करू लागलो, तर त्याचे काही दुष्परिणामही घडत असतात. त्याचीच माहिती आज आपण या पाठातून घेणार आहोत. माणसाच्या स्वभावाचे असे कितीतरी पैलू असतात. म्हणजेच माणूस कधी रागावतो, तर कधी कोणाला मोठया मनाने माफ करतो. त्याला कधी कोणाबद्दल मत्सर वाटतो. म्हणजे एखादा जर आपल्यापेक्षा पुढे निघाला असेल तर त्या व्यक्तीबद्दल त्याच्या मनात तिरस्कार निर्माण होतो. दुसऱ्याच्या प्रगतीवर माणूस जळतो तर माणसाला कधी एखादयाबद्दल प्रेम, माया, आपुलकी वाटत असते. कधी तो दुसऱ्याचा विचार न करता स्वार्थीपणाने आपलाच विचार करून वागतो, तर कधी वेळ आली तर इतरांसाठी आपल्या काही गोष्टींचा त्याग करायला, इतरांना मदत करायलाही तो पुढे येतो. म्हणजेच मुलांनो, राग, आनंद, दु:ख, मत्सर, नैराश्य, भीती, प्रेम, चीड, नाराज होणे या सगळया आपल्या भावना आहेत. वेगवेगळ्या प्रसंगांनुसार आपण त्या व्यक्त करीत असतो.