बेरीज पुढे मोजून

प्रस्तावना बेरीज पुढे मोजून

views

3:35
बेरीज पुढे मोजून: मुलांनो, आजही आपण बेरीजच शिकणार आहोत. याठिकाणी पाच आणि तीन मणी दिले आहेत. पाच अधिक तीन या मण्यांची बेरीज करताना सर्वात आधी पाचच्या पुढील तीन संख्या क्रमाने मोजाव्या लागतील. म्हणजेच ६, ७, ८. एकूण मणी झाले आठ. म्हणजेच एकूण बेरीज झाली ८. मग आता दुसरे उदाहरण पहा याठिकाणी आठ आणि पाच मणी दिले आहेत. मग याठिकाणी दोघांची बेरीज करताना ८ मण्यांच्या पुढे ५ मणी क्रमाने मोजू म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. पहा, ९, १०, ११ , १२, १३. एकूण १३ मणी झाले. मुलांनो, एका संख्येत दुसरी संख्या मिळवताना मोठ्या संख्येच्या पुढे लहान संख्येएवढ्या संख्या क्रमाने मोजल्या की बेरीज मिळते. उदा. ४ आणि ९ यांची बेरीज करताना ४ नंतर ९ संख्या मोजण्यापेक्षा ९ च्या पुढे चार संख्या जर मोजल्या तर ही बेरीज करायला सोपी जाईल.