मृदा

प्रस्तावना

views

6:45
मुलांनो आज आपण या पाठात मृदा निर्मितीची प्रक्रिया आणि मृदेमधील खनिजे व सेंद्रिय घटक, वनस्पतींची आवश्यक पोषणमूल्ये, मृदेच्या समस्या आणि त्या सुधारण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण उदा. काळी मृदा, जांभी मृदा इ. जमिनीची धूप आणि मृदेचे प्रकार याविषयी जाणून घेणार आहोत. मृदा : मृदा शब्दाची व्याख्या निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या रीतींनी केली आहे. सारांशाने ज्यावर वनस्पतीस आधार मिळतो, त्यांचे पोषण होते व त्या वाढू शकतात असा भूकवचाचा विघटित (रूपांतरित) थर म्हणजे मृदा असे म्हणता येईल. प्रादेशिक हवामान : खडकाच्या विदारणाच्या प्रक्रियेची तीव्रता ही प्रदेशाच्या हवामानानुसार ठरते. हवामानातील फरकामुळे एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार होते. उदा. सहयाद्रीच्या पश्चिम भागातील दमट हवामानामुळे बेसाल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार झाली आहे. याउलट सह्याद्रीच्या पूर्वेकडे असणाऱ्या दख्खनच्या पठारावरील कोरडया हवामानामुळे बेसाल्ट खडकाचे विदारण होऊन रेगूर मृदा तयार झाली आहे. जैविक घटक : मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक घटक मिसळणे आवश्यक असते. हे जैविक घटक प्रदेशातील मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. निसर्गातील वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष या घटकांचे विघटन गांडूळ, वाळवी, गोम, मुंग्या असे सूक्ष्मजीव करतात.