मृदा

मृदा संधारण

views

4:18
मृदा संधारण : मृदा संधारण म्हणजेच शेतजमिनीची धूप न होऊ देणे. पावसाच्या पाण्याच्या माराने, पाण्याच्या वेगवान प्रवाहाने, तसेच वाऱ्याच्या झोताने जमिनीतील सूक्ष्म कण, तसेच माती वाहून नेली जाते. या क्रियेस जमिनीची धूप म्हणतात. आता मृदा संधारणासाठी कोणत्या उपाययोजना राबवणे उपयुक्त ठरतात ते पाहूया. 1. वृक्ष लागवड : वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा महत्त्वाचा उपाय आहे. वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते. 2. समतल चर : उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते. समतल चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे मृदेची झीज थांबते. 3. पाणलोट क्षेत्र विकास योजना : महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकासाअंतर्गत ग्रामीण भागातील शेतात उताराच्या दिशेने बांधबंदिस्ती करण्याचा कार्यक्रम राबवला आहे. त्यामुळे पाणी अडवा –पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली आहे. 4. जलयुक्त शिवार योजना : महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच सुरू केली आहे.