ऋतूनिर्मिती भाग २

हे नेहमी लक्षात ठेवा

views

4:05
मुलांनो, आपण आपल्या इयत्ता सातवीच्या विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकातही सूर्याच्या भासमान भ्रमणाचा अभ्यास करत आहोत. सूर्य उगवण्यापासून ते मावळण्यापर्यंत म्हणजेच पूर्वेकडून- पश्चिमेकडे होणाऱ्या दैनिक भासमान भ्रमणाबद्दल तेथे विचार केलेला आहे. या ठिकाणी आपण सूर्याच्या वार्षिक भासमान भ्रमणाचा म्हणजेच उत्तर दक्षिण भ्रमणाचा विचार करत आहोत. दैनिक व वार्षिक भासमान भ्रमणात जरी सूर्य सरकत असल्याचे वाटत असले तरी, तो केवळ भास असतो. पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य स्थिती :- मुलांनो, समोर दिलेल्या आकृतीच्या साहाय्याने आपण पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य स्थिती समजून घेऊया. प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वीची सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती म्हणजे उपसूर्य स्थिती होय. ही स्थिती जानेवारी महिन्यात येते. अपसूर्य स्थिती म्हणजे प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वीची सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरील स्थिती होय. माहीत आहे का तुम्हांला :- सूर्य व पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेवरील वेग अपसूर्य स्थितीत कमी होतो. कारण सूर्यापासून पृथ्वीचे अंतर जास्त असते. तर उपसूर्य स्थितीत वाढते.