पर्यावरण आणि आपण

प्रस्तावना

views

3:58
प्रस्तावना: मुलांनो, आज आपण या पाठात पर्यावरणाविषयी माहिती घेणार आहोत. सर्वात आधी पर्यावरण म्हणजे काय? हे समजावून घेऊ. सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. किंवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात त्या प्रदेशातील हवा, जमीन, प्राणी, पर्जन्यमान, उंची, तापमान इत्यादींचा समावेश पर्यावरणात होतो. सजीवांना त्यांच्या जीवन संघर्षासाठी सभोवतालच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते. आपल्या अनेक प्रकारच्या गरजा पर्यावरणातून पूर्ण होत असतात. उदा: अन्न, वस्त्र, निवारा, हवा यांसारख्या मूलभूत गरजा पर्यावरणातूनच पूर्ण होत असतात. या सर्व गोष्टींची माहिती आपण या पाठातून घेणार आहोत. आज आपण आपल्या आसपासच्या परिसरात पाहतो, की अनेक कारणांसाठी जंगलतोड केली जात आहे. उदा: रस्ते बांधणे, घरे, इमारती बांधणे यांसारख्या कारणांसाठी झाडे तोडली जात आहेत. मग अशा प्रकारची जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाल्यास काय होईल? मी काही प्रश्न विचारतो त्यांची उत्तरे सांगा.