कृषी

कृषिपर्यटन

views

5:20
कृषिपर्यटन: पर्यटन म्हणजे मनोरंजनासाठी, किंवा अनुभव घेण्यासाठी केलेला प्रवास होय. कृषिपर्यटन हे पर्यटन व्यवसायातील एक नवे क्षेत्र आहे. उष्ण कटिबंधीय देशांमध्ये कृषिपर्यटनास मोठा वाव आहे. माणसाने सुरुवातीच्या काळात शेती हा व्यवसाय सुरू केला. हळूहळू मानवाने या क्षेत्रात प्रगती केली. उत्पादनवाढीसाठी मानवाने वेगवेगळे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली. रासायनिक कीटकनाशके किडनियंत्रणासाठी माणूस शेतात पिकांवर वापरू लागला. लवकरात लवकर फळे पिकावी म्हणून कृत्रिमपद्धतीचा वापर माणूस करू लागला. . उदा. ठिंबकसिंचन पद्धत त्यामुळे पाण्याची बचत होऊ लागली. शेतीमध्ये अयोग्य पद्धती टाळणे म्हणजेच जे रासायनिक खते, कीटकनाशके वापरली जातात त्याऐवजी सेंद्रिय खत किवा सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करणे. शेतातील मातीचा पोत सुधारण्यासाठी वारंवार शेतजमिनीत सेंद्रिय खत मिसळणे.