समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे

जरा विचार करा!

views

4:54
मुलांनो, आपण मागील कृतीत नेमके काय केले? तर आपण कागदावर बटाटा या त्रिमितीय वस्तूचे म्हणजेच उंची, रुंदी व लांबी आहे, अशा वस्तूचे द्विमितीय चित्र तयार केले. म्हणजेच, त्याचे रुंदी व लांबीचे चित्र तयार केले. डोंगर, पर्वत ही त्रिमितीय भूरूपे आहेत. या भूरुपांचे प्रत्यक्ष आडवे छेद घेऊन त्यांचे जमिनीवर किंवा कागदावर चित्र तयार करणे शक्य नसते. त्यासाठी गणिती पद्धत, सर्वेक्षण पद्धत इ.पद्धतींचा वापर करून या त्रिमितीय वस्तूंचे द्विमितीय चित्र तयार करता येते. ही आकृती म्हणजे भूपृष्ठाची प्रतिकृती आहे. म्हणजेच भूपृष्ठ कशा पद्धतीचा असतो. ते या आकृतीच्या माध्यमातून दर्शविले आहे. तर ही आकृती नीट पाहा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. भौगोलिक स्पष्टीकरण :- मुलांनो, आतापर्यंत आपण भूपृष्ठाची प्रतिकृती, समोच्चता रेषांचे नकाशे यांविषयी माहिती घेतली. या नकाशांचा उपयोग भूपृष्ठावरील विविध भूरूपांचा अभ्यास करताना होतो. या भूरूपांचा अभ्यास करताना त्या भूरूपांची समुद्रसपाटी पासूनची उंची, उंचसखलपणा, उतार, उताराची दिशा, तसेच त्यावरील जलप्रवाह म्हणजे नद्या, समुद्र, सरोवरे यांचा अभ्यास करावा लागतो. यासाठी विशिष्ट प्रकारे तयार केलेले नकाशे वापरतात. हे नकाशे म्हणजे समोच्चता दर्शक नकाशे होत.