समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे

उपक्रम

views

2:31
मुलांनो, तुम्हाला एक उपक्रम करायचा आहे. तुम्ही राहाता त्या गावाची किंवा शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची मीटरमध्ये शोधा. यासाठी तुम्ही ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेच्या नियोजन विभागाची मदत घेऊ शकता. त्यानंतर समुद्रसपाटीपासून तुमच्या गावाची किंवा शहराची उंची दाखवणाऱ्या समोच्च रेषा काढायच्या आहेत. प्रत्येक समोच्च रेषेतील अंतर जास्तीत जास्त 50 मी घ्यायचे आहे. आणि यातून तुमच्या गावाच्या/शहराच्या उंची पर्यत साधारणपणे किती समोच्चरेषा काढाव्या लागतील ते शोधायचे आहे. समजा तुमच्या शहराची उंची समुद्रसपाटीपासून 300 मीटर असेल तर तुम्हांला 6 रेषा काढाव्या लागतील. अशा एका समोच्च रेषेचे मूल्य 50 मीटर असेल. हा नकाशा डोंगराचा आहे. त्यात तुम्हांला एक किल्ला दिसतो आहे. तर तुम्ही अशी कल्पना करायची आहे की, त्या डोंगरावर तुम्ही गिर्यारोहणासाठी गेला आहात. हे पाहा, समोच्च रेषा म्हणजे नकाशातील समान उंचीची ठिकाणे जोडणारी रेषा होय. त्यामुळे या रेषा सहसा एकमेकींना छेदत नाहीत. अशा तऱ्हेने आपण या पाठात समोच्च रेषा, नकाशे काढण्याची पद्धती, त्याद्वारे दाखविण्यात येणारी भूरूपे यांची माहिती घेतली.