परिमिती व क्षेत्रफळ

परिमिती

views

3:16
आजपर्यंत आपण विविध भौमितिक आकारांचा अभ्यास केला आहे. आयत, चौरस, त्रिकोण, वर्तुळ अशा आकृत्यांचा व त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला आहे. एका आयताची परिमिती 64 सेमी आहे. त्याची लांबी 17 सेमी असेल तर त्याची रुंदी किती असेल? उत्तर: मुलांनो, या उदाहरणाचे नीट वाचन केले तर असे लक्षात येते की, या उदाहरणामध्ये परिमिती अगोदरच दिली आहे. मग हे उदाहरण सोडवायचं कसं बरं? तर अगदी सोपं आहे. आयताची परिमिती = 2 × (लांबी + रुंदी). या उदाहरणात रुंदी दिली नाही म्हणून आपण रुंदी x मानू, व सूत्रात किंमत ठेवू आणि उदाहरण सोडवू. आयताची परिमिती = 2 × (ℓ + b) 64 = 2 × (17 + x) सूत्रात किंमत लिहू. 64 = 2 × 17 + x समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 ने भाग देवू. 64/2 = (2 × 17 + x )/2 (2 ला 2 ने भाग दिला व 64 ला 2 ने भाग दिला) 32 = 17 + x x = 32 – 17 x = 15 म्हणजेच येथे x ची किंमत 15 आहे. याचाच अर्थ आयताची रुंदी 15 सेमी आहे.