पदार्थ, वस्तू आणि उर्जा

प्रस्तावना

views

4:25
आपल्याला माहीत आहे की, पदार्थ हा अनेक कणांपासून बनलेला असतो. उदा. बुंदीच्या लाडूचे उदाहरण घ्या. बुंदीचा लाडू अनेक बुंदीच्या कणांपासून बनलेला असतो; तर बुंदी बेसनाच्या अनेक कणांपासून बनलेली असते. म्हणजेच मुलांनो पदार्थ हा अनेक कणांपासून बनतो. आपल्याला कार्य करण्यासाठी ऊर्जेची म्हणजे शक्तीची गरज असते. त्याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. खडूने फळ्यावर लिहिले असता खडूच्या अवस्थेमध्ये बदल होतो. खडू लहान होतो. खडूचा वापर फळ्यावर लिहिण्यासाठी केल्याने त्याची झीज होऊन त्याचा आकार कमी झाला आहे.हे लिहिलेले डस्टरने पुसून तो डस्टर टेबलावर आपटला असता डस्टरमधून पांढरी धूळ बाहेर पडताना दिसते. हे कण खडूच्या रंगाचेच आहेत. हे कण खडूच्या रंगाचेच आहेत. खडूचा आकार कमी झाला आहे. डस्टर टेबलावर आपटल्याने डस्टरला चिकटलेले खडूचे कण खाली पडले. हे कण खडूच्याच रंगाचे आहेत. यावरून आपल्या लक्षात येते, की फळ्यावर खडूने लिहिले असता फळ्याला खडूचे कण चिकटले आणि फळा पुसल्यानंतर ते कण फळ्यापासून मोकळे झाले.