पदार्थ आपल्या वापरातील

प्रस्तावना

views

4:18
आपल्या दैनंदिन वापरात अनेक गोष्टी असतात. उदाहरणार्थ खुर्ची, टेबल, कपाट, भांडीकुंडी, कपडे, पुस्तके, साबण इत्यादींसारख्या अनेक वस्तूंचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात करतो. या वस्तू कशा तयार होतात, कशापासून तयार होतात, त्या वस्तू ज्या पदार्थांपासून तयार होतात ते पदार्थ कोणते, त्यांचे गुणधर्म काय या गोष्टींचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. आणि दैनंदिन वापरातील वस्तूंची निर्मिती कशी केली जाते ते ही पाहणार आहोत. पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. अनेक सूक्ष्म कण एकत्र येऊन पदार्थ तयार होतो आणि मग आपण या पदार्थांच्या वस्तू बनवतो. उदा. टेबल, खुर्च्या किंवा कपाट, या वस्तू बनविण्यासाठी लाकूड, प्लॉस्टिक, पोलाद या पदार्थांचा वापर करतो. कारण अशा प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी लागणारा मजबूतपणा या पदार्थांमध्ये असतो. तसेच या पदार्थांना आपल्याला हवा तसा आकारही देता येतो. यावरून असे लक्षात येते की, पदार्थांचे गुणधर्म पाहून वस्तू बनविण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो.