इतिहासाची साधने

प्रस्तावना , भौतिक साधने

589 views
4
3:11
भूतकाळ , भविष्यकाळ, वर्तमानकाळ असे काळाचे तीन प्रकार आहेत. इतिहासात आपण भूतकाळाचा अभ्यास करतो. भूतकाळ, म्हणजे घडून गेलेला काळ, घडून गेलेली घटना म्हणजे भूतकाळ. या घडून गेलेल्या घटना व काळाची माहिती आपल्याला पुस्तकातून मिळते. आपल्या आईवडिलांकडून किंवा मोठ्यांकडून त्याची माहिती मिळते. म्हणजेच ती आपली भूतकाळाची माहिती देणारी साधने होतात.याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागद या सर्व साधनांच्या आधारे आपल्याला इतिहास समजू शकतो. या सर्वाना ‘इतिहासाची साधने म्हणतात.इतिहासाची साधने तीन प्रकारची असतात. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. सर्व प्रथम आपण भौतिक साधने कोणती ते पाहू. आजही प्राचीन काळातील नाणी सापडतात. त्या नाण्यांवर त्या काळातील चित्रे कोरलेली दिसून येतात. त्या नाण्यांवरील चित्रे, नाण्यांसाठी वापरण्यात आलेला धातू, त्यांचा आकार यांवरुन आपण त्या काळातील सामाजिक व आर्थिक जीवनाची माहिती मिळवू शकतो. त्यांचा अंदाज बांधता येतो. भांडी, दागदागिने ,घरे, नाणी (प्राचीन काळातील या सर्वांची चित्रे) या सर्वांच्या साहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची ‘भौतिक साधने’ म्हणतात.