ऋतूनिर्मिती

प्रस्तावना

views

3:50
आपण आजच्या या पाठात ऋतूंची निर्मिती कशी होते ते पाहणार आहोत. पण, ही गोष्ट आपण दोन भागांत अभ्यासणार आहोत. या पाठात आपण दिवस व रात्र यांविषयी माहिती घेणार आहोत. पाठाच्या सुरूवातीला मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही त्यांची उत्तरे द्या. 1. पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होतात? उत्तर : पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच, पृथ्वीच्या स्वत:च्या भोवती फिरण्यामुळे दिन व रात्र होतात. 2. बरोबर ! पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? उत्तर : पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते त्या क्रियेला परिभ्रमण म्हणतात. 3. छान ! पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो? उत्तर : पृथ्वीला परिवलनासाठी 24 तास म्हणजेच एक दिवस, एक रात्र लागते. तर परिभ्रमणास 365 दिवस म्हणजे 1 वर्षं लागते. 4. अगदी बरोबर आता पुढील प्रश्न : आपला देश कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर : आपला देश उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. 5. व्वा! खूपच छान. पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत? उत्तर : कारण आपली पृथ्वी ही गोलाकार/ वर्तुळ स्वरूपाची आहे. त्यामुळे सूर्यासमोर असणाऱ्याच भागात सूर्यकिरणे लंबरूप पडतात. आणि दोन्ही ध्रुवांकडे (उत्तर व दक्षिण) ती तिरपी – तिरपी होत जातात.