वारे

प्रस्तावना

views

3:30
वारा आपल्याला दिसत नाही. परंतु त्याचा स्पर्श आपल्याला सहज जाणवतो. आपल्या डोक्यावरील केस हलतात, आपल्या शेजारील अनेक वस्तू हलताना दिसतात त्या वेळेस आपल्याला समजते की आपल्या शेजारी वारा किंवा हवा आहे. म्हणजे हवेच्या वाहण्याचा, वाऱ्याशी संबंध असतो. आता आपण एक प्रयोग करूया. त्यासाठी आपण रोहन आणि शामल ची मदत घेवूया. प्रथम हे दोघेही कागदाच्या दोन भेंडोळ्या बनवतील. आता हे दोघेही आपापल्या भेंडोळीला व टेबलाला स्पर्श न करता पुढे ढकलतील. हे दोघेही हात न लावता त्यांच्या भेंडोळ्या पुढे कशा ढकलतील सांगा बर? ते भेंडोळ्यांना फुंकर मारतील किवा त्यांना पेपरने वारा घालतील.