वारे

वाऱ्यांचे प्रकार

views

4:37
मुलानो वाऱ्याची वाहण्याची दिशा, त्यांचा कालावधी व त्या वाऱ्याने व्यापलेला प्रदेश यावरून त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. वाऱ्यांचे प्रमुख तीन प्रकार पडतात : ग्रहीय वारे, स्थानिक वारे आणि हंगामी वारे. त्याची माहिती आता आपण घेणार आहोत. ग्रहीय वारे : पृथ्वीवर जास्त दाबाच्या पटटयाकडून कमी दाबाच्या पटटयांकडे वर्षभर नियमित वाहणाऱ्या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. या वाऱ्यामुळे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापले जाते. म्हणजेच पृथ्वीच्या बऱ्याच भागावर हे वाहत असतात. म्हणूनही त्यांना ग्रहीय वारे म्हंटले जाते. उदाहरणार्थ पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, व ध्रुवीय वारे. यांची आता आपण सविस्तर माहिती घेऊ. पूर्वीय वारे :- दोन्ही गोलार्धात 250 ते 350 अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पटटयाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पटटयाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पूर्वीय वारे असे म्हणतात. पूर्वीच्या काळी व्यापारासाठी या वाऱ्यांचा उपयोग होत असे, म्हणून यांना ‘व्यापारी वारे’ असेही म्हणत. व्यापारी वाऱ्यांचे दोन उपप्रकार आहेत. 1)उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे – उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नर्ऋत्येकडे वाहत असल्याने यांना ‘ईशान्य व्यापारी वारे’ असे म्हणतात. आणि 2) दक्षिण गोलार्धातील आग्नेय व्यापारी वारे – दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहत असल्याने यांना ‘आग्नेय व्यापारी वारे’ असे म्हणतात. पश्चिमी वारे :- दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पटटयाकडून ६०० अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पटटयाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे किंवा प्रतिव्यापारी असे म्हणतात. तसेच पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होऊन त्यांची दिशा बदलते. त्यामुळे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, म्हणूनही त्यांना ‘पश्चिमी वारे’ असे म्हणतात. • ध्रुवीय वारे : दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पटटयाकडून ५५० ते ६५० अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या उपध्रुवीय कमी दाबाच्या पटटयाकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. हे वारे साधारणत: पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. म्हणून त्यांना ‘पूर्व ध्रुवीय वारे’ असे म्हणतात. उत्तर गोलार्धात या वाऱ्यांना ‘नॉरईस्टर’ असे म्हणतात. ते अतिशय वेगाने वाहतात.