सूर्य, चंद्र व पृथ्वी

सूर्यग्रहण

views

2:59
सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो व त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. सूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येला दिसते. चंद्राची पृथ्वीवर दोन प्रकारे सावली पडते. मध्यमभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ असते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो म्हणजेच सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. तर त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो. तेव्हा सूर्यबिंब अंशत: ग्रासलेले दिसते म्हणजेच जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. आपण चंद्राची अपभू व उपभू स्थिती अभ्यासली आहे. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो. म्हणजेच तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो. त्यामुळे चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहचत नाही. ती अवकाशातच संपते. अशावेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे म्हणजेच एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते. त्यालाच आपण कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतो.