सूर्य, चंद्र व पृथ्वी

ग्रहण एक खागोलीय घटना

views

4:07
ग्रहणे का व कशी घडतात याची माहिती घेतली. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की ग्रहणे होणे ही पूर्णत: खगोलीय घटना आहे. अजूनही आपल्या आसपास आपण पाहती की, अनेक लोक याला शुभ – अशुभ असे मानतात. ग्रहणापूर्वी त्याचे वेध लागतात असा एक काळ मानला जातो. आणि वेध लागल्यापासून ग्रहण सुटेपर्यंत काही खाऊ-पिऊ नये असे संकेत असतात. ग्रहण सुटल्यावर दानधर्म करावा असेही मानतात. गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहिले तर मुलामध्ये व्यंग निर्माण होते असे म्हणतात. खगोल शास्त्रज्ञासाठी ग्रहणे म्हणजे अभ्यासासाठी पर्वणीच असते. त्यातही खग्रास सूर्यग्रहण व कंकणाकृती सूर्यग्रहण ही विशेष करून असतात. आपण पाहिले की ही ग्रहणे पृथ्वीवर सर्वत्र एकाच वेळी दिसत नाहीत. त्यामुळे ज्या भागात हे ग्रहण दिसणार असेल त्या भागात खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात आणि ग्रहणाच्या स्थितीचा बारकाईने अभ्यास करतात. आपण ज्यावेळी सूर्यग्रहण पाहतो, त्यावेळी काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक असते, कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. ज्यावेळी सूर्यग्रहण होते, त्यावेळी अचानक काही काळासाठी काळोख होतो. पक्षी, प्राणी या काळोखामुळे गोंधळून जातात. त्यांच्या रोजच्या जैविक घड्याळापेक्षा ही घटना वेगळी घडत असल्याने त्यांचा या घटनेला मिळणार प्रतिसादही वेगळा असतो.