हवेचा दाब

प्रस्तावना

views

3:09
हवा आपल्याला दिसत नाही पण ती जाणवते. हवा जरी दिसत नसली तरी तिला वजन आहे. हे आपण तुमच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील तिसऱ्या पाठात काही प्रयोग करून पाहिले होते. या ठिकाणी आपण तो प्रयोग पुन्हा करून पाहू. यासाठी प्रथम दोन फुगे घ्या. एक फुगा तसाच ठेवा. आणि दुसऱ्या फुग्यात हवा भरा. आता हे दोन्ही फुगे तराजूत ठेवा. आणि सांगा आता तुम्हाला काय दिसतंय? हवा न भरलेल्या फुग्याचे पारडे वरती गेले आहे. आणि हवा भरलेल्या फुग्याचे पारडे खाली गेले आहे. याचाच अर्थ असा होतो की हवेला वजन असते. आणि ज्या वस्तूला वजन असते त्या वस्तूचा खालील वस्तूवर दाब पडतो. त्याचप्रमाणे वातावरणात असणाऱ्या हवेचा दाब पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतो. पृथ्वीवरील हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य यांसारख्या अनेक घडामोडी होतात, त्या कशा होतात त्याची काही प्रमुख कारणे आहेत ती पाहूया.