हवेचा दाब

भूपृष्ठावरील दाबपटटे

views

3:17
सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळते. पण ही उष्णता पृथ्वीवरील सर्व ठिकाणी सारखीच मिळत नाही. विषुववृत्तापासून जसजसे उत्तर ध्रुवाकडे व दक्षिण ध्रुवाकडे जाऊ तसतसे तापमान वितरणात असमानता दिसून येते. त्यामुळे प्रथम तापमान पट्टे निर्माण होतात. या तापमान पट्ट्यांवरून दाबपट्ट्यांची निर्मिती होते. आता आपण पृथ्वीवर निर्माण होणाऱ्या चार दाबपट्ट्यांची माहिती घेऊ. विषुववृत्तीय कमी दाबाचा पटटा :- मुलांनो आपण जर पृथ्वी आणि सूर्य यांचा विचार केला तर पृथ्वीवर फक्त कर्कवृत्त ते मकरवृत्त यांदरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात. त्यामुळे त्यामध्ये उष्णतेची तीव्रता जास्त असते. म्हणून 23०30’ उत्तर ते 23०30’ दक्षिण हा प्रदेश उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणून ओळखला जातो. जास्त तापमान असल्यामुळे या प्रदेशातील हवा तापते व ती प्रसरण पावते. मुलांनो प्रसरण आणि आकुंचन या क्रिया तुम्हांला माहीत असतील – हिवाळ्यात खोबरेल तेल गोठते. म्हणजे आंकुचन पावते कारण तापमान कमी असते. आणि त्या तेलाला उष्णता दिली की ते प्रसरण पावते. त्याप्रमाणे उष्णतेने हवा प्रसरण पावते आणि हलकी होऊन आकाशाकडे जाते. ही क्रिया सतत घडत असल्याने या प्रदेशाच्या मध्य भागात म्हणजेच 0० उत्तर ते 5० दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेच्या कमी दाबाचा पटटा निर्माण होतो. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पटटे : मुलांनो विषुववृत्तीय प्रदेशातून तापलेली हलकी हवा आकाशाकडे अधिक उंचीवर गेल्यानंतर उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेशाकडे वाहू लागते. भूपृष्ठालगतची हवा तापते परंतु जसजसे आपण वरवर उंचीवर जातो तसतसे तापमान कमी जाणवते. उंचीवरील या कमी तापमानामुळे ती थंड होते आणि वजनाने जडही होते. जड झाल्यामुळे ती खाली येते. जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 250 ते 350 अक्षवृत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. या हवेचे वजन जास्त असते त्यामुळे या हवेचा दाबही जास्त. परिणामी 250 ते 350 अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. ही हवा वजनाने जड असली तरीही ती कोरडी असते. त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही. म्हणूनच पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात.