मृदा

नेहमी लक्षात ठेवा:

views

5:56
मुलांनो, तुम्हाला मृदा आणि माती यांतील फरक माहीत आहे का? मृदा म्हणजे माती नव्हे. तर मृदेमध्ये अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव यांचा समावेश असतो. मृदेत अनेक जैविक व अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. याउलट, माती हा मृदेतील केवळ एक पदार्थ आहे. थोडक्यात कुंभार वापरतो ती माती. आणि शेतकरी वापरतो ती मृदा. भौगोलिक स्पष्टीकरण : मुलांनो आता आपण जो प्रयोग केला त्यावरून आपल्याला असे दिसून येते की, आपल्या जीवनात मृदेचे किती महत्त्व आहे. कारण वनस्पती वाढीसाठी मृदा महत्त्वाची असते. आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे ‘वनस्पती जीवन’ होय.