मृदा

नकाशा वाचन:

views

5:00
नकाशा वाचन: शि: मुलांनो, हा पाहा नकाशा. या नकाशात वेगवेगळे रंग वापरून महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार आणि कोणत्या प्रकारची मृदा कोठे आढळते ते दाखविले आहे. मग आता मी तुम्हांला काही प्रश्न विचारते. तुम्ही नकाशात नीट निरीक्षण करून उत्तरे द्या. आपल्याला या नकाशाच्या मदतीने आपल्या महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार आणि कोणत्या प्रकारची मृदा कुठे आढळते हे समजले आहे. मृदेचे एकूण चार प्रकार आहेत ते म्हणजे जाडी भरडी मृदा, काळी मृदा, जांभी मृदा, किनारपट्टीवरील गाळाची मृदा, आणि पिवळसर तपकिरी मृदा इत्यादी. यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. जाडी भरडी मृदा : विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून जाडी भरडी मृदा तयार होते. महाराष्ट्रातील दख्खन पठाराच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर ही मृदा आढळते. काळी मृदा : काळी मृदा ही रेगूर मृदा किवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील प्रसिध्द आहे. नदयांच्या खोऱ्यातील गाळाच्या मैदानी प्रदेशात व दऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते. जांभी मृदा : सहयाद्री पर्वताच्या पश्चिमेस असणाऱ्या कोकण किनारपट्टीच्या भागात व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. या मृदेचा रंग तांबडा असतो. किनारपट्टीवरील गाळाची मृदा : कोकणातील बहुतांश नदया या कमी लांबीच्या असून त्या अत्यंत वेगाने वाहतात. त्यामुळे या नदयांनी वाहून आणलेला गाळ त्यांच्या मुखाशी साचतो. पिवळसर तपकिरी मृदा :अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात पिवळसर तपकिरी मृदा आढळते. ही मृदा प्रामुख्याने चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यांच्या पूर्व भागात व सहयाद्री पर्वतीय भागात आढळते. . मुलांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील मृदेचे वेगवेगळे प्रकार पाहिले आहेत.